S M L

माझं टार्गेट भाजपच असेल, राणेंचा भाजपवर प्रहार

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2016 09:49 PM IST

senior-congress-leader-narayan-rane-addresses-a-press-conference-after-resigning-02

29 मे :  विधानपरिषदेत गेल्यानंतर भाजप माझं टार्गेट असेल, असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला आहे. तसंच विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी सोनिया गांधींचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही जोरदार घणाघात केला.

विधानपरिषदेत गेल्यानंतर सरकारविरोधात भूमिका मांडायला मिळेल, याचा आनंद आहे. मी अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत, पण ज्या प्रकारे आताचं सरकार सूडाचं राजरकारण करतं आहे, ते चूक आहे, असं राणे म्हणाले. माझ्या पराभवचा काळ हा वाईट होता, असं मी बोलणार नाही. कदचित, मला देवाने विश्रांती करायला संधी दिली, असं मी बोलेन, असंही ते म्हणाले.

काँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी नारायण राणेंनी कुडाळमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मुंबईत बांद्रामधून ते पुन्हा शिवसेनेकडून पोटनिवडणुकीत हरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2016 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close