S M L

कांदा प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, रस्त्यावर कांदा ओतून केलं आंदोलन

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2016 08:08 PM IST

Onion farmer213

29 मे : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी कांदा रस्त्यावर ओतून रास्तारोको आंदोलन केलं.

कांद्याच्या भाव गडगडल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी कोर्टात याचीका दाखल केली असुन कोर्टात लढणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी अनेकदा महाराष्ट्र दौर्‍यावर आले. मात्र, दुष्काळाबाबत ठोस पाऊल का ऊचलले नाही असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकार दुष्काळावर मदत करण्यापेक्षा लाखो रुपये जाहीरातबाजीवर खर्च करत आहे ही बाब चुकीची असल्याचं वळसे पाटलांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2016 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close