S M L

तन्मयला अटक करा अन्यथा 'खळ्ळ खटॅक', मनसेचा इशारा

Sachin Salve | Updated On: May 30, 2016 02:30 PM IST

तन्मयला अटक करा अन्यथा 'खळ्ळ खटॅक', मनसेचा इशारा

मुंबई - 30 मे : थट्टा-मस्करीच्या नावाखाली धिंगाणा घालणार्‍या तन्मय भटची सर्वत्र निंदा होत आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या दोन दिग्गज व्यक्तींवर आश्लाघ्य भाषेत टीप्पणी केल्याप्रकरणी मनसेनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय. तसंच तन्मयला अटक केली नाहीतर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिलाय.

एआयबी या युट्यूबवर लोकप्रिय असलेल्या चॅनलचा सहसंस्थापक तन्मय भट आणि त्याचे साथीदार या ना त्या विषयांवर व्हिडिओ क्लिप तयार करत असता. याआधीही या टीमने रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरला घेऊन एक कार्यक्रम केला होता. रणवीर आणि अर्जुनने या कार्यक्रमात जाहीरपणे शिव्या देण्याची जणू स्पर्धाच रंगली होती. हे प्रकरण पोलिसांत गेल्यामुळे रणवीर आणि अर्जुन अडचणीत आले होते. आता पुन्हा एकदा तन्मय भटने थेट भारतरत्न असलेल्या दिग्गज व्यक्तींवर नको त्या भाषेत टीप्पणी करून वाद ओढावून घेतलाय. 'पागल पॅरोट' या युट्यूब चॅनलवरुन तन्मयचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालाय.

या व्हिडिओत तन्मयने सचिन तेंडुलकर आणि लतादीदींची मिमिक्री करत खालच्या भाषेत टीप्पणी केलीये. तन्मयच्या या वाचाळगिरीमुळे सर्वच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मनसेनं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तन्मय भटला अटक करण्याची मागणी केली. 'तन्मय भटचा कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही' नाहीतर, 'मनसे स्टाईल आंदोलन करणार' असा इशाराही मनसेनं दिला.

दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली आणि तन्मय भटला अटक करण्याची मागणी केली. तन्मय भटच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची स्पेशल ब्रँच तपास करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2016 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close