S M L

एकनाथ खडसेंचं मंत्रिपद धोक्यात ?

Sachin Salve | Updated On: May 30, 2016 10:34 PM IST

30 मे : वादाच्या भोवर्‍यात सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झालीये. एमआयडीसी भूखंड, जावयाची लिमोझीन कार प्रकरण आणि दाऊदसोबत संभाषण प्रकरणाची दिल्लीच्या नेतृत्त्वाने दखल घेतली असून खडसेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर चौकशी होईपर्यंत खडसेची महसूलची जबाबदारी काढून घेण्याची शक्यता आहे.khadse07B

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे चारही बाजूने घेरले गेले आहे. एकापाठोपाठ झालेल्या आरोपांमुळे खडसेंपुढे अडचणीचा डोंगर उभा राहिलाय. खडसेंवर दाऊद सोबत संभाषणांचे आरोप आहे. मात्र भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदीचं प्रकरण गंभीर आहे.

एमआयडीसी जमीन खरेदीत खडसेंच्या घरच्यांची थेट नावं आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतलीये. सर्वांचा विरोध पत्कारुन घरामध्येच पद वाटपामुळे पक्षनेतृत्व नाराज असल्याचं कळतंय. एमआयडीसी प्रकरणात तक्रार दाखल केली असून गुन्हाही दाखल होवू शकतो. गुन्हा दाखल होवू नये यासाठी खडसेंची धावाधाव सुरू आहे. उद्या जर गुन्हा दाखल झाला तर चौकशी होईपर्यंत खडसेंची महसूलची जबाबदारी काढून घेण्याची शक्यता आहे. पण, महसूल काढल्यास खडसेची थेट नाराजी पक्षाला झेलावी लागणार आहे. जर असं घडलं तर समाजाच्या एका थरात एक विशिष्ट संदेश जाण्याची पक्षाला भिती आहे. त्यामुळे खडसेंबद्दल पक्ष सावधगिरी बाळगून पावलं टाकत आहे.

तर दुसरीकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या दाऊद इब्राहिमला फोन कॉल्स प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी याचिका हायकोर्टात आज दाखल केली गेली. याचिका दाखल करून घ्यायची की नाही, यावर 6 जूनला सुनावणी होणार आहे. एथिकल हॅकर मनीष भंगाळेनं ही याचिका केली आहे. तर एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. पुण्यातील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात उद्योजक हेमंत गांवडे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. खडसेंनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या आरोपांवर चर्चा केल्याचं कळतंय.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी खडसेंवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. आम्ही मुख्यमंत्र्यांना 48 तासाचा कालावधी देत आहोत तोपर्यंत त्यांनी काही केलं तर ठीक, नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असं दमानिया यांनी म्हटलंय. आम्हाला जळगावात खूप त्रास झाला. ज्यांनी आम्हाला माहिती दिली त्यांचे फोटो काढले गेले. सगळी माहिती त्यांना पोहचवले गेले असा आरोप त्यांनी केलाय. एकनाथ खडसेंच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2016 10:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close