S M L

सिक्वेलचा सिलसिला...

विनोद घाटगे, मुंबई29 मार्चसिनेमाचा सिक्वेल हा प्रकार आपण हॉलिवूड सिनेमात नेहमीच पाहात आलो आहोत. आता बॉलिवूडमध्येही सिक्वेल सिनेमाची संकल्पना जोर धरू लागली आहे. 2011 हे आगामी वर्ष बॉलिवूडसाठी तर सिक्वेल सिनेमांचेच ठरणार आहे. बॉलिवूडच्या 5 हिट सिनेमांचे सिक्वेल्स या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 2004मध्ये आलेल्या धूम सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर 2006 मध्ये पुन्हा एकदा धूमची धूम बॉक्स ऑफिसवर दिसली. हृतिक आणि ऐश्वर्याच्या एन्ट्रीने धूम 2 ची जादू प्रेक्षकांवर चांगलीच चालली. हे दोन्ही सिनेमे सुपरहीट झाल्याने या सिनेमाच्या निर्मात्यांना वेध लागलेत ते धूम 3 चे. 2011 ला म्हणजेच 5 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर धूमचा तिसरा भाग थिएटरमध्ये झळकणार आहे.धूममधील रेस तर आपण पहाणारच आहोत पण त्याचसोबत सैफ अली खान आणि अक्षय खन्नाची रेससुद्धा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहता येईल. रेस 1 चीच स्टारकास्ट या सिनेमात असेल. अपवाद फक्त बिपाशाचा. रेसच्या दुसर्‍या भागात ती असणार नाही. अब्बास मस्तान यांनीच याही भागाचे दिग्दर्शन केले आहे.2009 वर्ष सलमानसाठी तसे वाईटच गेले त्याचा फक्त वॉन्टेड सिनेमाच प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणू शकला. तेवढे एकच यश सलमानच्या नावावर कोरले गेले. कदाचित म्हणूनच सलमान या सिनेमाचा सिक्वेल बनवत आहे. याच वर्षी हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र शूटिंग लांबल्याने वॉन्टेड दोन 2011मध्येच आपल्याला पाहता येईल.या तीन सिनेमाबरोबरच डॉनचा सिक्वेलही बनतोय. डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा किंग खान दिसेल. तर सिक्वेलच्या या शर्यतीत पार्टनरचीही पार्टनरशीप असणार आहे. पार्टनरचा दुसरा भागही ओरिजनल स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येत आहे.थोडक्यात एकदा हिट झालेला सक्सेस फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरून नशिब आजमवण्याचा प्रयत्न हे सगळेच निर्माते करत आहेत. आता त्यांच्या यशाचा सिक्वेल बनतोय का हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2010 01:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2010 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close