S M L

विधान परिषदेसाठी भाजपकडून सहा उमेदवार मैदानात

Sachin Salve | Updated On: May 31, 2016 02:13 PM IST

मुंबई - 31 मे : विधान परिषदेचा आखाडा आता चांगलाच तापलाय. भाजपने 6 उमेदवार दिल्याने विधान परिषद निवडणुकीतली चुरस वाढलीये. पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी आर.एन. सिंह आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर कऱण्यात आलीये.

vidhan_parishd_bjpमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधनपरिषदेसाठी 6 आणि राज्यसभेसाठी 2 उमेदवार अर्ज भरण्यासाठी विधनभवनात दाखल झाले आहे. विधान परिषदेसाठी भाजपने सहाच्या सहा जागी उमेदवार अर्ज दाखल केले आहे. सोमवारी भाजपतर्फे पाच नावांची घोषणा करण्यात आली. भाजपने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटनेला संधी दिलीये. सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना उमेदवारी दिलीये. तसंच मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीण दरेकर यांनाही संधी देण्यात आलीये. त्याचबरोबर सुजितसिंह ठाकूर तर आज अखेरच्या वेळी आर. एन. सिंह आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2016 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close