S M L

ठाण्यात घोडबंदर रोडवर दुहेरी हत्याकांड

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2016 09:28 AM IST

ठाणे - 01 जून : घोडबंदर रोड पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडामुळे चर्चेत आले आहे. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड परिसरातील रिजन्सी या उच्चभ्रु वसाहतीत एका ज्येष्ठ नागरीकाबरोबरच त्याची सेवा करणार्‍या व्यक्तीची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कासारवडवली पोलीस करीत असून कोणत्या कारणासाठी हत्या झाली याचा तपास करत असतानाच या ठिकाणी इमारतीत असणार्‍या सीसीटीव्हीचा देखील उपयोग करणार आहेत. हत्येच कारण अद्याप समजू शकले नाही याचाच तपास पोलीस करित आहेत.

kolhapur crimeठाण्यातील घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड येथील रिजन्सी हाइट्स या वसाहतीमधील 5 क्रमांकाच्या ऑक्सफर्ड टॉवर इमारतीत 1503 क्रमांकाच्या रूममध्ये मंगळवारी रात्री उशिरा 2 मृतदेह आढळून आले. 70 वर्षीय सीताराम श्रॉफ आणि त्यांची सेवा करणारे 35 वर्षीय संतोष लवंगरे यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केली. सीताराम श्रॉफ यांच्या तोंडावर उशी ठेवून तर संतोषच्या अंगावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली. सदरची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळतातच त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाजगी सुरक्षारक्षक असताना सदरची हत्या झालीच कशी असा प्रश्न उपस्थित झालाय. या ठिकाणी हत्या झाल्यानंतर काही ऐवज लंपास झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2016 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close