S M L

'डेक्कन क्वीन'च्या वाढदिवसाला गालबोट, जागेसाठी महिला प्रवाशांची दादागिरी

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2016 12:51 PM IST

'डेक्कन क्वीन'च्या वाढदिवसाला गालबोट, जागेसाठी महिला प्रवाशांची दादागिरी

पुणे - 01 जून : पुणेकरांच्या लाडक्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला आज 87 वर्ष पूर्ण झालीये. प्रवाशांच्या लाडक्या 'डेक्कन क्वीन'चा 87 वा वाढदिवस पुणे स्टेशनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पण, आज या वाढदिवशी गालबोट लावलंय. पासधारक महिलांनी इतर महिलांना सीटवर बसू दिलं नाही. त्यावरुन बाचाबाची झाली अखेर या प्रकरणी पासधारक महिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे.

डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे ते मुंबई प्रवासाची हमखास राणी...आज ही डेक्कन क्वीन 87 वर्षांची झालीये. दरवर्षी प्रमाणे या आपल्या लाडक्या 'क्वीन'चा वाढदिवस पुणेकर प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. खरं तर कमी वेळेत आणि जलद गतीने जाणार्‍या या रेल्वेवर अनेक प्रवाशी प्रेम करतात. पण हे प्रेम 'डेक्कन क्वीन'वर असलं तरी एक्स्प्रेसमध्ये मात्र वेगळंच चित्र असतं. पासधारक प्रवाशी सीटसाठी नेहमी अडून राहतात. एवढंच नाहीतर इथं प्रवाशांच्या अशा टोळ्याच तयार झाल्या आहेत. जशा मुंबईतील लोकलमध्ये असतात. आणि या टोळ्या जर दुसरा कुणी प्रवाशी सिटवर बसण्यासाठी आला तर दमदाटी करून हुसकावून लावता. आजही असाच प्रकार घडला. सीटवर बसण्याच्या वादावरून महिला प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. पासधारक महिलांनी इतर महिलांना सीटवर बसू दिलं नाही. त्यावरुन चांगलाच वाद झाला. हा वाद दमदाटीवर आला. अखेर या वादात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांत या महिला पासधारक महिलांविरोधात तक्रार दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2016 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close