S M L

आग्रा इथे बोअरवेलमध्ये अडकलेल्या सोनूचा अखेर मृत्यू

13 सप्टेंबर, आग्रा - आग्रा इथे बोअरवेलमध्ये पडलेल्या, दोन वर्षांच्या सोनूचा अखेर मृत्यू झाला. तब्बल चार दिवसांच्या प्रयत्नानंतर लष्करानं सोनूला आज बाहेर काढलं. पण तो मृत असल्याचं आढळून आलं. आग्राजवळच्या एका गावात चार दिवसांपूर्वी सोनू खेळत असतना उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. सुरुवातीला जिल्हा प्रशासनानं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यश आलं नसल्याने लष्कराला बोलावण्यात आलं. जवानांनी बोअरवेलला समांतर असा दुसरा खड्डा खणला. आणि मोठ्या प्रयत्नानंतर सोनूला बाहेर काढलं. पण, दोन दिवसांपूर्वीच सोनू अन्न आणि पाणी घेत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याच्या जगण्याची शक्यता पण धुसर असल्याचं डॉक्टरांनी त्याचवेळी म्हटलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 10:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close