S M L

दाऊदशी संबंधाच्या संशयावरुन कॉन्स्टेबलने लुटले दीड लाख !

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2016 10:10 AM IST

दाऊदशी संबंधाच्या संशयावरुन कॉन्स्टेबलने लुटले दीड लाख !

औरंगाबाद - 02 जून : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आहे म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने एका नागरिकाला त्रास दिल्याची घटना औरंगाबादेत घडलीये. जावेद शेख असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्याने मोहम्मद मुन्नवर या व्यक्तीला त्रास देऊन दीड लाख रुपये वसूलही केले.

औरंगाबादमध्ये राहणारे मोहम्मद युनूस मोहम्मद मुन्नवर या व्यक्तीचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सोबत संबंध आहेत म्हणून मानसिक त्रास दिला जातोय आणि हा त्रास पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख देत असल्याचं समोर आलंय. अखेर याबद्दलची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आलीये.मोहम्मद युनूस मोहम्मद मुन्नवर यांच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी जावेद शेख आणि दोन शिपायांनी घराची बेकायदेशीर झडती घेतली आणि घरातील दीड लाख रूपये नेले. आणि तक्रार केली तर खोट्या गुन्ह्यात अडकवू अशीही धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. जावेद शेख वेळोवेळी खंडणीच्या मागणीसाठी त्रास देत आहे. न्याय मिळाला नाही तर आमचे कुटुंब आत्महत्येचा विचार करीत असल्याचं मोहम्मद मुन्नवर यांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2016 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close