S M L

डोंबिवली स्फोटाचं कारण अजूनही गुलदस्त्यातच

Sachin Salve | Updated On: Jun 2, 2016 01:50 PM IST

डोंबिवली - 02 जून : प्रोबेस कंपनीमधल्या स्फोटाचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी अग्निशमन दलानं कल्याण डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर केलाय. हा स्फोट अतिशय तीव्र होता, त्यामुळे त्याचं निश्चित कारण अजून समजलेलं नाही असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.

Dombivli rescueडोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत 26 मे रोजी स्फोट झाल्याने भीषण आग लागली होती. सुरुवातीला कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली होती. परंतु नंतर या स्फोटाची तीव्रता पाहता हा स्फोट बॉयलरचा नसल्याचं स्पष्ट झालं. या स्फोटाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

अग्निशमन विभागाने महापालिकेला सादर केलेल्या अहवालामध्ये अग्निशमन दलाला कंपनीच्या मागील बाजूस 23 नग प्रोप्रोईझल अल्कोहोलचे ड्रम्स सुस्थितीत आढळून आले. हे ड्रम्स घटनास्थळी उपस्थित असलेल्या केमिकल तज्ज्ञांच्या देखरेखीमध्ये लगतच्या दुसर्‍या कंपनीमध्ये हलविण्यात आले होते. त्यानंतर कंपनीमध्ये वापरण्यात येणारे आणि ढिगार्‍याखाली दबलेले 12 ते 13 थायोनिल क्लोराइड या टॉक्सीस केमिकल तज्ज्ञांच्या सल्ल्याने ती रसायने मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस तळोजा येथे हलविण्यात आले.

जे ड्रम्स लिकेज झाले होते त्यावर लाइम पावडर टाकून न्युट्रलाइज करण्यात आले. तसंच झायोनिल रसायनाचे ड्रम्सही या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते तेही सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केलंय. विविध तज्ज्ञांचं मत घेऊन आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या स्फोटांचं निश्चित कारण समजू शकेल असं या अहवालात म्हटलंय. त्यामुळे डोंबिवली स्फोटाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2016 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close