S M L

शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयात लुडबूड करू नये, भाजपचे प्रत्युत्तर

Samruddha Bhambure | Updated On: Jun 2, 2016 11:18 PM IST

sanjay_raut3

02 जून : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षाने काय करावं, याचा सल्ला शिवसेनेने देऊ नये आणि भाजपच्या अंतर्गत विषयात लुडबूड करू नये. याबाबतीत भाजपने स्पष्ट भूमिका घेतली आहे व आवश्यक तो निर्णय घेण्यास भाजप नेतृत्त्व सक्षम आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी IBN लोकमतशी बोलताना एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांबाबत पक्ष काही भूमिका मांडत नसल्याचे धादांत असत्य वक्तव्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारीच पत्रकारांशी बोलताना खडसे यांच्याविषयीची पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. खडसे यांच्यावर होणार्‍या आरोपांमध्ये तथ्य नाही आणि भाजप त्यांच्या पाठीशी आहे, असं दानवे यांनी जाहीर केलं आहे. तीच पक्षाची भूमिका असल्याचं भांडारी यांनी म्हटलं आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं, अशी मागणी शिवसेनेने गुरुवारी केली. त्याला लगेचच भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2016 11:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close