S M L

खुनाच्या दोन घटनेनं धुळे हादरलं

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2016 09:08 AM IST

धुळे - 03 जून : धुळे जिल्हा पुन्हा एकाच रात्रीत झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी हादरून गेला आहे. शहरातील मोहाडी परिसरात राहणार्‍या मांगीलाल गोरख पाटील यांच्यावर रात्री अचानक अज्ञात हल्लेखोरांनी धार धार शस्त्रने वार करून खून केला, त्यांच्या हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य एक प्रकरणात जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात सुभाष विष्णू पवार या मोबाईल व्यापार्‍याचा दरोडेखोरांनी खून केला आहे.kolhapur crime

पवार हे मुळचे दाऊळ गावाचे रहिवासी होते ते आपल्या मोबाईलच्या दुकानात झोपले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना पकडण्यात अजून यश आलेलं नाही. या प्रकारामुळे दोंडाईचा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनामधील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. धुळे शहरात रविवारीच दोन गुन्हाच्या घटना घडल्या होत्या त्यात हे आणखी दोन खून झाल्याने, जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2016 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close