S M L

शोध ब्रम्हांड निर्मितीचा

30 मार्चपृथ्वीचा आणि ब्रम्हांडाची निर्मिती कशी झाली, हे शोधून काढण्यासाठी आज स्वित्झर्लंडमध्ये बिग बँग प्रयोग केला जाणार आहे. यात अतिशय वेगाने प्रवास करणार्‍या प्रोटॉनच्या किरणोत्सर्गांना एकमेकांवर आदळवले जाणार आहे.भुयारांच्या या भूलभुलैयात शास्त्रज्ञ शोधतायत आकाशगंगेच्या जन्माचे गुपित. जगभरातून आलेले आठ हजार शास्त्रज्ञ इथे हा प्रयत्न करणार आहेत. बिग बँग नंतरचा क्षण पुन्हा निर्माण करण्याचा. हा प्रयोग यशस्वी झाला, तर ब्रम्हांडाविषयीच्या आपल्या ज्ञानात मूलभूत बदल होऊ शकतात. आणि हे सगळे शक्य आहे, 27 किलोमीटर लांब भुयारामुळे. प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने काहीच जाऊ शकत नाही, आम्ही काही अतिसूक्ष्म कणांना आम्ही जवळपास प्रकाशाच्या गतीला आणणार आहोत. आणि अर्थातच ते जेवढ्या जास्त गतीने जातील तेवढी त्यांची ऊर्जासुद्धा वाढेल. आणि या ऊर्जेचे रूपांतर पदार्थ कणांत होऊ शकते, इसे प्रयोगात सहभागी झालेले शास्त्रज्ञ सांगतात. पदार्थांना वस्तूमान देणार्‍या हिग्स्‌च्या कणांचा शोध गेल्या कित्येक दशकांपासून शास्त्रज्ञ करत आहेत. वर्षानुवर्षे न सुटलेल्या अनेक कोड्यांची उत्तरे आता यातून मिळणार आहेत. निसर्गाच्या सुक्ष्म रचनेचे आकलन होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या 100 वर्षांत विज्ञानाने सगळ्यात मोठी दोन आव्हाने समोर ठेवली. ती म्हणजे महाकाय ब्रम्हांडाला समजावून घेणे आणि दुसरे अतिसूक्ष्म अशा अणूला समजावून घेणे.ब्रम्हांडाच्या जन्माच्या वेळी बिग बँग नावाचा एक महाकाय स्फोट झाला होता, असे आपण मानतो. CERN मधल्या या ऍक्सिलरेटर्समध्ये बिग बँगनंतरची परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ब्रम्हांडाच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती कशी होती, याचे ज्ञान आपल्याला होणार आहे. हे कितीही अकल्पनीय वाटत असले तरी यातून काहीतरी अद्भूत आणि महत्त्वाचे पुढे येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2010 08:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2010 08:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close