S M L

आरोप सिद्ध करून दाखवा, मी पद सोडेन; एकनाथ खडसेंचं आव्हान

Samruddha Bhambure | Updated On: Jun 3, 2016 09:48 PM IST

आरोप सिद्ध करून दाखवा, मी पद सोडेन; एकनाथ खडसेंचं आव्हान

03 जून :  विविध आरोपांमुळे बेजार झालेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे त्यांच्यावरच्या सर्व आरोपांचं पुन्हा खंडन केलं आहे. आरोप सिद्ध करून दाखवा, असं थेट आव्हान एकनाथ खडसेंनी शिवसेनेला दिलं आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

केवळ आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती बघून आरोप सिद्ध करून दाखवा. जर माझ्याविरोधातले आरोप सिद्ध झाले तर मी पद सोडेन असं आव्हान खडसेंनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिलं आहे. मी चूक केली असेल तर पक्ष आणि मुख्यमंत्री कारवाई करण्यास मोकळे आहेत. पक्ष माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं दानवेंनी अनेकदा हे सांगितलं आहे. त्याचबरोबर मला पक्षाकडून कुठलीही सूचना मिळालेली नाही. पण मी एक निष्ठावान कार्यकर्ता, पक्षाचा आदेश पाळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

भोसरी जमीनच्या खरेदी संदर्भातले सगळे कागदपत्रं आरटीआय अंतर्गत उपलब्ध आहेत, ते आरोप करणार्‍यांनी पाहावेत असा सल्लाही खडसेंनी दिला. आज आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी फोनवरून बातचित केली, त्यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना खडसेंनी सविस्तर उत्तरं दिली.

दरम्यान, विविध आरोपांमुळे बेजार झालेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे नेमके आहेत तरी कुठे? हा प्रश्न निर्माण झाला असताना अखेर IBN लोकमतच्या मध्यामतून खडसेंचं सर्वांना दर्शन झालं. मोबाईल क्लीप आणि ट्विटरच्या माध्यमातून खडसेंनी मला शेतकर्‍यांसाठी काम करु द्या, असं आवाहन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2016 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close