S M L

बहुजन समाजाच्या नेत्यांवर अन्याय - नारायण राणे

Samruddha Bhambure | Updated On: Jun 4, 2016 02:49 PM IST

बहुजन समाजाच्या नेत्यांवर अन्याय - नारायण राणे

senior-congress-leader-narayan-rane-addresses-a-press-conference-after-resigning-02

04 जून : भाजप जाणीवपूर्वक बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला आहे. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राणेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, खडसे भाजपमधील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांत खडसेंच्या ज्याप्रकारचे आरोप होत आहेत, त्यावरून भाजप बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असं दिसत असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला रावसाहेब दानवे प्रसारमाध्यमांसमोर पक्ष खडसेंच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचं सांगतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पक्षाकडे खडसेंवर कारवाई करण्यासाठी आग्रह धरतात. खडसे यांच्यासारख्या नेत्याचे इतके धिंडवडे काढण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2016 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close