S M L

खडसेंच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करा -अशोक चव्हाण

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2016 06:01 PM IST

ashok chavanनांदेड - 04 जून : एकनाथ खडसेंचा केवळ राजीनामा घेऊन विषय संपत नाहीतर या सगळ्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीये.

खडसेंच्या राजीनामाच्या मागणीसाठी आणि एकंदर भाजप सरकारच्या विरोधात अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये आज आंदोलन करण्यात आलं.

खडसेंनी राजीनामा दिला ही आनंदाची बातमी आहे. पण नुसते राजीनामा देऊन चालणार नाही तर त्यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी अशोक चव्हाणांनी केलीये.

दरम्यान, भाजपच्या ज्या-ज्या मंत्र्यांची प्रकरणे समोर आली. त्या सर्व प्रकरणाची न्यायलायीन चौकशी करण्याची मागणी देखील चव्हाण यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2016 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close