S M L

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2016 11:10 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन

04 जून : ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.त्या 80 वर्षांच्या होत्या. मराठी रंगभूमीवरील तेजस्वी काळाच्या साक्षीदार असलेल्या सुलभाताईंच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं अपरिमित नुकसान झालंय. गेला काही काळ त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. मात्र या आजारासोबत त्यांची सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उद्या संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मराठी रंगभूमीवरील महत्त्वाच्या रंगकमीर्ंमध्ये कायम त्यांचं नाव घेतलं गेलं. विजया मेहता, सत्यदेव दुबे यांच्यासोबतच सुलभा ताईंची नाट्यप्रतिभा ही कायमच चर्चेत असायची. पती अरविंद देशपांडे यांच्या सोबतीने 'आविष्कार'या संस्थेची स्थापना करण्यापासून, ते या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी नाटकं सादर करण्यासाठी त्यांचा कायमच पुढाकार होता.

'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'दुर्गा झाली गौरी', 'वाडा चिरेबंदी' यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यासोबतच मराठीत त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं मोठं नुकसान झालंय. 'घर हो तो ऐसा...','इजाझत', 'भूमिका', 'वीरासत', 'इंग्लिश विंग्लिश' अशा हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं होतं.

तर मराठीत 'जैत रे जैत', 'विहीर', 'हापूस', 'इन्व्हेस्टमेंट' यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारलीये. त्यामुळे त्यांना 'आई' अशी अोळख मिळाली होती. गेला काही काळ त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं अपरिमित नुकसान झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2016 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close