S M L

खडसेंच्या राजीनाम्यामुळे भाजपवर कोणता होणार परिणाम ?

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2016 10:51 PM IST

04 जून : एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. खडसेंच्या राजीनाम्यामुळे बहुजन नेत्याचा बळी गेला अशी चर्चा राजकारणाच्या सारीपाटावर रंगलीये. त्यामुळेच भाजपमध्ये बहुजनांवर कायम अन्याय होतो, या आरोपाला अधिक बळ मिळणार आहे. तसंच विधान परिषद आणि सभागृहात खडसेंसारखा नेता आता भाजपकडे नसणार आहे.

khadse333गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपचा बहुजन चेहरा म्हणून खडसे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपमध्ये मुंडे-गडकरी यांच्या संघर्षाच्या काळात खडसे यांनी नेहमीचं स्वतःला वेगळ ठेवलं. त्याशिवाय दोन्ही गटात समन्वयही त्यांनी ठेवला. खडसे हे अभ्यासू तसंच

शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत संपर्क असणारा नेता असल्यानंच 1995 साली जेंव्हा सेना-भाजप युतीचं राज्य सत्तेत आलं तेव्हा खडसे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. त्यांचा हा ग्राफ सतत वाढतच राहिला. सुरुवातीला उच्च तंत्र शिक्षणविभागाचे मंत्री म्हणून 4 महिने काम केल्यानंतर त्यांनी 1995 ते 1997 या काळात अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं.

त्यानंतर 1997 पासून सरकार जाईपर्यंत जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर विरोधी बाकावर बसल्यानंतर सत्ताधारी पक्षाला आक्रमकपणे 'सळो की पऴो' करणारे खडसे विधानसभेत उभे राहिल्यानंतर मोठ्या प्रकरणाला वाचा फोडतील असंच वातावरण असायचं . त्यांच्या याच आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे 2009 साली विरोधीपक्षाची जबाबदारी पक्षांनं त्यांच्यावर टाकली. जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. जेव्हा भाजपचं सरकार 2014 साली राज्यात आलं तेव्हा खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते.

मात्र त्यांना महसूल विभागावर समाधान मानावं लागलं. पण आपल्या स्वभावानुसार खडसे यांनी मुख्यमंत्रिपद न मिळाल्याची नाराजी बोलण्यातून आणि कृतीतून दाखवली. त्याचाच परिणाम मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर नाराज होते. त्यानंतर मात्र खडसे यांच्याशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना अखेरीस मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

विधान परिषदेत आता नारायण राणे आल्यानं खडसेंसारखा खमका नेता आता भाजपकडे नसणार आहे. त्यामुळे परिषदेत विरोधी पक्ष अधिक प्रबळ होणार आहे. एकनाथ खडसेंची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. सभागृहात विरोधकांना आक्रमकपणे तोंड देणार असं व्यक्तिमत्व खडसेंचं होतं. एवढंच नाहीतर आतापर्यंत भाजपमध्ये बहुजनांवर कायम अन्याय झाला असा आरोप झालाय. पंकजा मुंडे, विनोद तावडे ही त्याची उदाहरणं. आता या आरोपाला अधिक बळ मिळणार आहे. खडसेंनी राजीनामा दिला असला तरी त्यांची नाराजी खान्देशात पक्षसंघटनेला अडचणीची ठरू शकते. खडसेंना राजीनाम्यामुळे जळगावमध्ये शिवसेनेनं एकच जल्लोष केला. सेनेचा हा उत्साह येणार्‍या काळात वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2016 10:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close