S M L

...आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आलीये -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2016 08:28 PM IST

ajit pawar ncpeसोलापूर - 05 जून : कमरेखालची भाषा वापरल्यामुळे आघाडी सरकारच्या काळात अडचणीत आलो अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी यांनी दिलीये. जिभेवर नियंत्रण ठेऊन काळजीपूर्वक बोला, दुधानं तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून पिण्याची वेळ आली असं अजितदादा म्हणाले.

सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवारांनी फिरकी घेतली. कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर, बोलणर्‍यालाही वाटतं की, चला, लोक हसतायेत, तर अजून हसवावं. पण नंतर मग हसवता हसवता, त्यालाच रडायची पाळी येते, असा निशाणा अजित पवारांनी सोपल यांच्यावर साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2016 08:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close