S M L

...त्यांची 'मिठाई' बंद केली म्हणून आरडाओरड -मोदी

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2016 08:41 PM IST

...त्यांची 'मिठाई' बंद केली म्हणून आरडाओरड -मोदी

कतार - 05 जून : आम्ही काही लोकांची 'मिठाई' बंद केली त्यामुळे ती लोकं आमच्यावरच टीका करत आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारच्या दौर्‍यावर आहे. आज कतारची राजधानी दोहामध्ये भारतीय समुदायाशी मोदींनी संवाद साधला.

दोहामध्ये पंतप्रधानांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. आम्ही देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम छेडली आहे. अजून बरंच काही काम करायचं आहे. आम्ही गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी न घेण्याचं आव्हान केलं. तसंच हीच सबसिडी लोकांच्या थेट खात्यात जमा केली. त्यामुळे सबसिडीमध्ये होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा बसला. आतापर्यंत यामुळे तीन कोटी लोकांना याचा फायदा झालाय. ज्यांना ही मिठाई खाता येईना त्यामुळे ती लोकं सरकारवर टीका करत आहे असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

आतापर्यंत अनेक सरकार आले आणि गेले पण सीमेवर लढणारा जवान तसाच तिथे उभा आहे. कतारमध्ये भारतीय समुदायाचा भारताच्या विकासात मोलाचा वाटा आहे. संपूर्ण जगात भारताचा चेहरा बदला आहे. मला जेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद कामी येतो अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रम संपल्यानंतर 'जब तक सूरज चांद रहेंगा, मोदी तेरा नाम रहेंगा' घोषणांनी परिसरात दणाणून गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2016 08:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close