S M L

आगामी निवडणुकांत अल्पसंख्याकंची वोट बँक मिळवण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न

13 सप्टेंबर, दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं अल्पसंख्यांकानाही जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी प्रचार यंत्रणा कशी असावी, यासाठी काँग्रेसनं एका पी.आर.एन्जेन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. ओरिसा आणि कर्नाटकमध्ये ख्रिश्चनांवर होणारे हल्ले तसचं मुस्लीम आणि दहशतवाद याचा संबंध लावण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांनाही उत्तर देण्यासाठी काँग्रेस सज्ज होत आहे.भाजपशासीत राज्यांमध्ये ख्रिश्चनांना टार्गेट केलं जात आहे. दुसरीकडे मुस्लीमांवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केला जात आहे. विरोधकांच्या याच आक्षेपांचा फायदा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं आम-आदमीचा नारा दिला होता. आता 2009 मध्ये अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरुन राजकीय फायदा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.महागाई आणि दहशतवादी हल्ल्यामुळे ' आम आदमी हैराण ' झाला आहे. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लोकांचा कल आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसनं आता नव्या मुद्यांचा शोध सुरू केला आहे. काँग्रेसच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी ठरवणार्‍या पी.आर.एजेन्सीजनाही नवे मुद्दे काय असावेत यासाठी बराचं विचार करावा लागत आहे.एकु णच लोकसभा निवडणूकीत अल्पसंख्याकांची मते आपल्यालाचं मिळावीत यासाठी काँग्रेसनं जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. मुस्लीम समाज आणि दहशतवाद यांचा परस्पर संबध आणि ख्रिश्चनांवरील हल्ले याविरुद्ध काँग्रेसनेआवाज उठवला आहे. त्यासाठी भाजपवर जातीयवादाच्या राजकारणाचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे ही मतं आपल्यालाच मिळतील , असा काँग्रेसला विश्वास आहे.पण बजरंग दलावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, लोकजनशक्ती पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी काँग्रसवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. काँग्रेसनं ही मागणी मान्य केली नाही तर मात्र अल्पसंख्याकांचा रोष त्यांना सहन करावा लागेल,अशी भीती व्यक्त केली जात आहे. या बातमीचा व्हिडिओ पहाण्यासाठी सोबतच्या आयकॉनवर क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 10:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close