S M L

राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदललं ही चांगली सुरुवात -ऋषी कपूर

Sachin Salve | Updated On: Jun 8, 2016 04:21 PM IST

राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदललं ही चांगली सुरुवात -ऋषी कपूर

08 जून : सरकारी योजनांना गांधी घराण्याचं नावावरुन टीका करणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा ट्विट करून गांधी घराण्यावर निशाणा साधलाय. राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलंय. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय असं म्हणत ऋषी कपूर यांनी काँग्रेसजनांना चिमटा काढलाय.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून महात्मा फुले जीवनदायी योजना असं करण्यात आलं. या निर्णयाचं अभिनेता ऋषी कपूर यांनी स्वागत केलंय. हा योग्य वेळी घेतलेला निर्णय आहे, असं त्यांनी ट्विट केलंय. देशातल्या अनेक रस्ते आणि इतर प्रकल्पांना नेहरू-गांधी परिवाराची नावं का द्यायची, अशी जाहीर भूमिका काही आठवड्यांपूर्वी ऋषी यांनी घेतली होती. तेव्हाही ट्विटरवर त्यांना खूप पाठिंबा मिळाला होता.

काय म्हणाले ऋषी कपूर ?

"चांगले आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय ! महाराष्ट्र सरकारनं एका चांगल्या गोष्टीची सुरुवात केलीय. अभिनंदन !"

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2016 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close