S M L

संजय निरुपम हुकूमशहा, कामत समर्थकांची निदर्शनं

Sachin Salve | Updated On: Jun 8, 2016 07:09 PM IST

संजय निरुपम हुकूमशहा, कामत समर्थकांची निदर्शनं

मुंबई -08 जून : मुंबई काँग्रेसमध्ये बंडाळी माजलीये. गुरुदास कामत समर्थकांनी काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं करायला सुरूवात केलीय. संजय निरूपम हे हुकूमशहा आहेत. निरूपम यांच्यामुळेच काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप देवेंद्र आंबेरकरांनी केलाय.

आंबेरकर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आहेत. गुरूदास कामत यांच्या राजीनाम्यावरून मुंबई काँग्रेसमध्ये असलेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतले कामत समर्थक 25 नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात असून ते सर्व जण राजीनाम्या देण्याची शक्यता आहे. उद्या महापौर स्नेहल आंबेकरांकडे सर्व नगरसेवक आपला राजीनामा पाठवणार असल्याचही बोललं जातंय. संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कामत गटाला डावलण्यात येत होते. सोमवारी कामत यांनीही पक्षाचा त्याग करत राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केल्याने कामत समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. सध्या महापालिकेत काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. त्यापैकी 25 नगरसेकांनी राजीनामा दिल्यास महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ 27 होईल त्यामुळे पालिकेतली अनेक समीकरणहीं बदलणार आहेत.

दरम्यान, आपल्या राजीनाम्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी कोणताही मोर्चा काढू नये किंवा नगरसेवकांनीही राजीनामा देऊ नये असं आवाहन गुरुदास कामत यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2016 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close