S M L

विनाअनुदानित शाळांसाठी उपोषण करणार्‍या शिक्षकाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2016 05:03 PM IST

विनाअनुदानित शाळांसाठी उपोषण करणार्‍या शिक्षकाचा मृत्यू

जालना - 10 जून : विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी 9 दिवस उपोषण करणार्‍या शिक्षकाचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाला. गजानन खरात असं या शिक्षकाचं नाव होतं. जाफराबाद तालुक्यातल्या वरखेडा इथल्या समर्थ विद्यालयात ते शिक्षक होते. खरात यांच्या मृत्युमुळे शिक्षक संघटनांमध्ये शोककळा पसरलीय.

जाफराबाद इथल्या विना अनुदानित समर्थ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक गजानन विठोबा खरात यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय. गेल्या 1 जूनपासून औरंगाबाद इथं अनुदानित शाळांना अनुदानित करण्याच्या मागणीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रकृती अस्वस्थ झाल्याने खरात वरखेडा वीरो इथल्या घरी काल आले आणि आज पहाटे त्यांचे निधन झाले.

गेल्या 15 वर्षांपासून राज्यातील 1300 हुन अधिक विना अनुदानित शाळांमधून तब्बल 52 हजार कर्मचारी विना वेतन काम करीत आहेत. आघाडी शासन आणि सध्याचे महायुती शासनाकडून अद्यापही या कर्मचार्यांना आश्वासनाशिवाय काहीच हाती आले नाही. विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आतापर्यंत शेकडो आंदोलनं केलीय. या सर्व आंदोलनात मयत शिक्षक खरात यांचा सक्रीय सहभाग असायचा. गेल्या 1 जूनपासून संघटनेने औरंगाबाद इथं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान खरात यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने ते काल वरखेडा वीरो इथल्या घरी आले आणि आज सकाळी त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

शासनाने विनाअनुदानित शिक्षकाच्या मागण्याकडे लक्ष न दिल्यानेच माझे सहकारी गजानन खरात यांचा आज दुर्देवी मुत्यू झालाय. अघोषित शाळांना घोषित करण्यासाठी खरात यांनी आपला जीव गमावला. अशी व्यथा शिक्षकांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2016 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close