S M L

कुठे बदलला देश?, परिस्थिती जैसे थेच, पवारांचं भाजपवर टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2016 08:52 PM IST

मुंबई - 10 जून : देश बदलला अशी जाहिरातबाजी भाजपकडून केली जातेय पण केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून देशाचं शेती उत्पादन घटलं आहे. सरकार बदललं खरं, मोदी सरकार येऊन 2 वर्षं झाली तरी अजून परिस्थिती जैसे थेच आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन देशातल्या घटनांची निंदानालस्ती करता असा आरोपही पवारांनी केला.

sharad pawar 15thराष्ट्रवादी काँग्रेसचा आज 17 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. त्यानिमित्त मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. पक्षाध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी परदेशात जातात. पण, जेव्हा भारताचा पंतप्रधान देशाबाहेर जातो तेव्हा तो देशाचा पंतप्रधान म्हणून जातो भाजपचा पंतप्रधान म्हणून जात नाही.

मोदींनी देशातल्या घटनांची निंदानालस्ती परदेशात केली, हे पहिल्यांदा घडलं आहे. माझा परदेशात जायला विरोध नाही. पण देशातली अंतर्गत परिस्थिती काय आहे हे पाहण्याची पहिली जबाबदारी नेत्यांची आहे असा सल्लावजा टोला पवारांनी मोदींना लगावला.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आल्याचं बोललं जात होतं. पण आता ही लाट ओसरली आहे. पश्चिम बंगाल, केरळ आणि दिल्ली विधानसभेत भाजपचा 100 टक्के पराभव झाला आहे. लोकांनी आता मोदी सरकारला स्पष्टपणे नाकारलं आहे. दोन वर्षांच्या खुशीत मोदी सरकार देश बदलला अशी जाहिरातबाजी करत आहे. पण दोन वर्षांत परिस्थिती जैसे थेच आहे. उलट दोन वर्षात देशाचं शेती उत्पादन घटलंय. रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. लोकांच्या भुकेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न यात केंद्र आणि राज्य सरकारनं लक्ष घातलं नाही अशी टीकाही पवारांनी केली.

शरद पवारांनी दिघा अनधिकृत प्रकरणावर टीप्पणी केलीये. दिघा भागातील रहिवाश्यांवर अन्याय होतोय. दिघ्यातील 95 इमारती पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे जवळपास 25000 लोक जाणार कुठे?, मुंबई विमानतळाच्या बांधकामाआड येणारी घरं पाडली गेली. त्यांच्यासाठी 23000 घरं तयार केली पण त्यांचे वाटप झालेले नाही. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा फक्त भांग बदलला आहे असं सांगत पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2016 07:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close