S M L

मुलगा होत नाही म्हणून महिलेचं इच्छा मरणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2016 08:14 PM IST

मुलगा होत नाही म्हणून महिलेचं इच्छा मरणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

बीड - 10 जून : एका महिलेनं इच्छा मरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. आपल्याला तिन्ही मुलीच आहेत, आणि मुलगा होत नसल्यानं सासरच्या छळाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलंय. अनिता देवकुळे असं या महिलेचं नाव आहे. ती मूळची बीड जिल्ह्यात असलेल्या माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड इथली आहे.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अनिता देवकुळे हिच विवाह ढलेगाव येथील विष्णु देवकुळे यांच्या बरोबर 10 वर्ष पूर्वी झाला.

लग्नानंतर 3 मुली झाल्या परंतु वंशाचा दिवा मुलगा हवा असल्या कारणाने सासरी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर सातत्याने अत्याचार होऊ लागले. त्यामुळे आता जागून करायचं काय या उद्देशान त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन तयार करून पाठवलं असून यात त्यांनी आपणास जगण्याची इच्छा नाही सासरच्या मंडळीनी माझ्यावर अत्याचार केला असल्याच नमूद केलंय आणि मुख्यमंत्र्यांनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यात त्यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2016 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close