S M L

हा सनातनला बदनाम करण्याचा डाव -अभय वर्तक

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2016 06:57 PM IST

ABHAY VARTAK11 जून : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला अटक ही संस्थेला बदनाम करण्याचा डाव आहे असा आरोप संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला. विरेंद्र तावडे हा हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता नाही असा दावाही वर्तक यांनी केला.

सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरेंद्र तावडेचा सनातनशी संबंध नसल्याचा बचाव केला. विरेंद्र तावडे हा हिंदू जनजागृती समितीचा सदस्यच नाही. हे फक्त हिदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्यासाठी केलं जात आहे. असा दावाच अभय वर्तक यांनी केला.

तसंच काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आम्ही जे अनुभवलं तेच आम्ही सत्ता बदल झाल्यानंतर ही अनुभवतो आहोत. जे साध्वीचं नुकसान झालं ते भरुन निघू शकणार नाही. आमच्या कित्येक साधकांचं आयुष्य बरबाद झालं ते भरून निघू शकत नाही. सीबीआयने पुण्यातल्या 15 साधकांना पकडून त्यांची चौकशी केली आणि त्यांच्या पॉलिग्राफी टेस्ट सुद्धा केली पण त्यातून काहीच मिळालं नाही आणि तावडेची अटक ही या प्रकरणातील पहिली नाही तर तिसरी अटक आहे असंही वर्तक म्हणाले.

सीबीआय ही पानसरे आणि दाभोळकर कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे वागताहेत असा आरोपही वर्तक यांनी केला. आपचे नेते आशिष खेतान आदल्या दिवशी ट्वीट करतात आणि दुसर्‍या दिवशी अटक होते.मुळात हे एक आंतराष्ट्रीय स्वरुपाचं षड्‌यंत्र आहे असंही वर्तक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2016 06:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close