S M L

राहुलची शतकी खेळी, भारताचा झिम्बाब्वेवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2016 08:36 PM IST

राहुलची शतकी खेळी, भारताचा झिम्बाब्वेवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

11 जून : झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्या वन डे मॅचमध्ये भारताने शानदार विजयी सलामी दिलीये. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला त्यांच्या मायदेशी दणदणीत 9 विकेट्सने पराभव केलाय. झिम्बाब्वेने दिलेले 169 रन्स माफक आव्हान भारताने 42.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

KL Rahul (R) plays a shot during the 1st ODI against Zimbabwe. (Photo Credit: Getty Images)

टॉस जिंकून झिम्बाब्वेने पहिली बॅटिंग घेतली. भारतीय गोलंदाजाचा सामना करणार्‍या झिम्बाब्वेच्या बॅट्समनची चांगलीच भंबेरी उडाली. 32 व्या ओव्हरपर्यंत फक्त 100 धावांपर्यंतच झिम्बाब्वे टीम मजल मारू शकली. झिम्बाब्वेकडून चिंगबुराने झुंज देत कसाबसा स्कोअर हलता ठेवला. चिंगबुराने सर्वाधिक 41 रन्स केले. भारतीय टीमकडून जसप्रीत बुमराने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर बरिंदर सरा आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. झिम्बाब्वेची टीम 169 रन्स करू शकली.

169 रन्सचं माफक आव्हानाचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या टीम इंडिया 11 रन्सवर पहिला झटका बसला. करूण नायर 7 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर केएल  राहुल आणि अंबाती रायडूने शानदार बॅटिंग करून विजयाचा मार्ग मोकळा केला. राहुलने नॉटआऊट 100 रन्स केले तर अंबातीन रायडूने निर्णायक 62 रन्सची नॉटऑऊट खेळी केली. विशेष म्हणजे राहुलने आपल्या वनडे करिअरच्या पहिल्याचं मॅचमध्ये शतकी खेळी करून शानदार सुरूवात केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2016 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close