S M L

...हा अतिरेकी हल्ला असू शकतो -ओबामा

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 09:13 AM IST

...हा अतिरेकी हल्ला असू शकतो -ओबामा

13 जून : ओरलँडो गोळीबार प्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दुख व्यक्त केलंय. ही दहशतवादाची घटना असल्याची दाट शक्यता आहे. आरोपीचं आयसीस कनेक्शन उघड झाल्यामुळे या घटनेमागे अतिरेकी हल्ला करण्याचा उद्देशही असू शकतो असा संशयही ओबामांनी व्यक्त केला.

या प्रकरणाचा तपास एफबीआयकडे सोपवण्यात आलाय. या कठीण प्रसंगी देशातील सगळ्यांनी एकत्र येऊन अशा शक्तींचा विरोेध करायला हवा. यामागे जे कुणी असतील, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असं ओबामा म्हणाले. आमच्या समलिंगी आणि तृतीयपंथी मित्रांसाठी हा खूप वाईट दिवस आहे, ही घटना धर्मद्वेष्ट्या भावनेतून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने करण्यात आली, असं ओबामा म्हणाले. 5 मिनिटं बोलून ओबामांनी कोणताही प्रश्न न घेता पत्रकारांची रजा घेतली. यासोबतच अमेरिकेत सर्वसामान्य नागरिकांना शस्त्र बाळगण्यावरून सुरू असलेल्या चर्चेला या घटनेमुळे नव्याने तोंड फुटल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

दरम्यान, अमेरिकेतल्या या घटनेनंतर जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ही घटना धक्कादायक आहे. पीडितांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close