S M L

'सांवरे'च्या सेटवर जमावाकडून दगडफेक, कुणाल खेमू जखमी

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 09:49 AM IST

'सांवरे'च्या सेटवर जमावाकडून दगडफेक, कुणाल खेमू जखमी

लखनऊ - 13 जून : अभिनेता कुणाल खेमू याच्यावर शनिवारी रात्री हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 'सांवरे' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान हा हल्ला झाल्याचं समजतंय.यात कुणाल चांगलाच जखमी झालाय.

सांवरे या सिनेमाचं शुटिंग लखनऊमध्ये सुरू होतं. त्यावेळी काही लोकांचा इमामवाड्याच्या बाहेर नौबतखान्यात शुटिंग करायला विरोध होता. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे तेथील स्थानिकांचं म्हणणं होतं. मात्र, तरीही शुटिंग चालूचं ठेवल्याने एका समुहाने शुटिंगच्या सेटवरच दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये कुणाल जखमी झाला असून त्याच्या हाताला दुखापत झालीये.सांवरेच्या गाण्याच्या शुटिंगदरम्यान हा प्रकार घडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close