S M L

ऑरेंज सिटीच्या नावाखाली नागपुरातील शासकीय इमारती भगव्या

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 12:09 PM IST

ऑरेंज सिटीच्या नावाखाली नागपुरातील शासकीय इमारती भगव्या

नागपूर - 13 जून : नागपूर महापालिकेच्या काही शाळा आणि महापालिकेच्या काही इमारतींना संत्र्याचा रंग देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेलं नागपूर शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जावी असा त्यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलंय.

मात्र, नागपूरचं हे भगवाकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर पिंक सिटी जयपूरच्या धर्तीवर नागपूर ही ऑरेंज सिटी दिसावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे नागपूर महानगर पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांचं म्हणणं आहे. पण लोकोपयोगी काम सोडून महानगर पालिका नेहमी असे वादग्रस्त निर्णय का घेते असा सवाल उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close