S M L

दाभोलकरांच्या हत्येसाठी हवं होतं विदेशी पिस्तुल,तावडे-अकोलकरच्या ई-मेल्समधून खुलासा

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 01:06 PM IST

पुणे - 13 जून : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विरेंद्र तावडेच्या चौकशीतून धक्कादायक बाबी आतासमोर येत आहे. तावडे आणि सारंग अकोलकरच्या इमेल्समधून दाभोलकरांच्या हत्येसाठी "प्रोजेक्ट दाभोलकर" या नावाने कट रचला होता. एवढंच नाहीतर या दोघांनी यासाठी एक युनिट उभारण्याची तयारी सुद्धा केली होती. दाभोलकरांच्या हत्येसाठी गावठी ऐवजी विदेशी बनावटीची पिस्तुल हवी होती अशी माहिती आता समोर आलीये.

virendra_tawdeडॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला शुक्रवारी रात्री सीबीआयने अटक केली. त्याला 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीये. सीबीआयने तावडेची आता उलटतपासणी सुरू केली आहे. या चौकशी दरम्यान सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे

यांच्यात ई-मेलद्वारे संभाषण सीबीआयच्या हाती लागलंय.

गोवा बॉम्बस्फोटातला संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि तावडे या दोघांनी 2008 ते 2013 या कालावधीत एकमेकांना 200 इमेल्स पाठवले होते. दाभोळकरांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात या मेलमध्ये संभाषण झालं असल्याचं सीबीआयच्या सूत्रांमार्फत समोर येतंय. या कटाला "प्रोजेक्ट दाभोलकर" असं नाव देण्यात आलं होतं.

तसंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी त्यांना विदेशी बनावटीची बंदूक हवी होती, कारण गावठी बनावटीच्या बंदूक निकामी होण्याची शक्यता असते. आणि त्यांनी ही जोखीम घ्यायची नव्हती. म्हणून त्यांना परदेशी बनावटीची बंदूकच हवी होती. तसंच ही बंदूक कोठून खरेदी करायची या संदर्भातही त्यांच्यात इमेलवरून संवाद झाल्याचे समोर आलंय.

 ई-मेलमधून धक्कादायक खुलासा

- सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्यात ई-मेलद्वारे संभाषण

- ई-मेलमधून दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचं आलं समोर

- कटाचं नाव 'प्रोजेक्ट दाभोलकर'

- मराठी भाषेत ई-मेल असून रोमन लिपीचा वापर

- एका ई-मेलमध्ये मध्य प्रदेशहून 'गावठी हत्यार' असा उल्लेख

- दुसर्‍या ई-मेलमध्ये 'विदेशी हत्यार' असा उल्लेख

- तिसर्‍या ई-मेलमध्ये 'स्वत: पिस्तूल बनवण्यासाठी युनिट बनवणार' असा उल्लेख

- युनिटसाठी लागणारा पैसा चांगल्या किंवा चुकीच्या मार्गाने गोळा करू असा उल्लेख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close