S M L

दाभोलकरांच्या हत्येमागे सनातनच, अकोलकरने झाडल्या गोळ्या?

Sachin Salve | Updated On: Jun 14, 2016 12:41 PM IST

दाभोलकरांच्या हत्येमागे सनातनच, अकोलकरने झाडल्या गोळ्या?

पुणे - 14 जून : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याची शक्यता आहे. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा

सारंग अकोलकर असल्याचा दावा सीबीआयच्या सूत्रांनी केलाय. अटकेत असलेल्या विरेंद्र तावडेने दाभोलकरांच्या मारेकर्‍याचं रेखाचित्र ओळखलं असून हे रेखाचित्र सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकरशी मिळतंजुळतं आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन वर्षांच्या तपासानंतर अखेर मागील आठवड्यात सीबीआयने पहिली अटक केली. जनजागरण समितीच्या विरेंद्र तावडेला सीबीआयने अटक केली.

तावडे आणि गोवा स्फोटातील आरोप सारंग अकोलकर यांनी दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालं. दोघांच्या ई-मेल्सचा डाटा सीबीआयच्या हाती लागलाय. सीबीआयने दाभोलकरांच्या मारेकर्‍याचे रेखाचित्राची तावडेकडून ओळख पटवून घेतली. त्याने हे रेखाचित्र सारंग अकोलकरचे असल्याचं सांगितलं. सारंग अकोलकर सध्या फरार आहे. तो 2009 च्या गोवा स्फोटातला आरोपी आहे. सारंग हा सनातनचा साधक आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सुरुवातीपासून सनातनचा हात असल्याचा संशय होता. तावडेच्या खुलाशानंतर तो आता खरा ठरत आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये डॉ. कलबुर्गी हत्या प्रकरणातही विरेंद्र तावडेचा सहभाग असल्याचं संशय बळावलाय. सीबीआय पथक आज संध्याकाळी कर्नाटक सीआयडीची भेट घेण्याची शक्यता आहे.

कोण आहे सारंग अकोलकर ?

- व्यवसायानं टेलिकॉम इंजिनीअर

- सनातनचा साधक

- 2009च्या गोवा स्फोटातला आरोपी

- 2009 मध्ये गोवा स्फोट प्रकरणी एनआयए हैदराबादने सारंगच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकला

- अकोलकरच्या वडिलांची आणि कुटुंबीयांची चौकशी केली, तेव्हापासून अकोलकर फरार

- एनआयएच्या रेड कॉर्नर नोटीसमध्ये सारंग अकोलकरचं नाव

- गोवा स्फोट प्रकरणी एनआयएने ठपका ठेवलेले मास्टरमाईंड सारंग अकोलकर आणि रुद्र पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2016 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close