S M L

मुंबई पालिकेचा अजब कारभार, घोटाळेबाज कंत्राटदारांना पुन्हा 105 कोटींचे कंत्राट

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2016 09:25 AM IST

मुंबई पालिकेचा अजब कारभार, घोटाळेबाज कंत्राटदारांना पुन्हा 105 कोटींचे कंत्राट

मुंबई - 15 जून : मुंबईत गेल्यावर्षीच्या नालेसफाईच्या घोटाळ्यात अडकलेल्या कंत्राटदारांना यावर्षी पुन्हा नालेसफाईच्या कंत्राटाचं बक्षिस मिळालंय. तब्बल 105 कोटींचं कंत्राटाची खैरात पालिकेनं या कंत्राटदारांना वाटलीये.

यावर्षी ज्यांना हे कंत्राट देण्यात आले त्यापैकी अनास आणि एस.एन.बी इन्फ्रास्ट्रक्चरच हे गेल्या वर्षी नालेसफाईच्या घोटाळ्यात अडकले आहेत. तरी त्यांना मोठ्या नाल्यांच्या सफाईचे कंत्राट देण्यात आले आहे.

नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याने चौकशी लावण्यात आली होती. मात्र मुंबई पालिकेनं दोनवेळा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामाला उशीर होत होता. अखेर एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा कंत्राट द्यावे लागले.

ते त्याच कंत्राटदारांना देण्यात आलंय. अशा प्रकारे मुंबईतल्या मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी 70 कोटीचे आणि मिठी नदीसाठी 35 कोटींवर कंत्राट देण्यात आले. असं एकूण 105 कोटीचे कंत्राट पालिकेला फसवणार्‍या कंत्राटदारांना देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2016 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close