S M L

मुंबईतले 27 मोकळे भूखंड खासगी संस्थांच्या ताब्यात ?

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2016 02:46 PM IST

mumbai_landमुंबई - 15 जून : मुंबईतील 27 मोकळे भूखंड पुन्हा खासगी संस्थांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. देखभालीसाठी हे भूखंड खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. आता हा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी येणार आहे.

मोकळ्या भूखंडांचं धोरण अजूनही मंजूर करण्यात आलेलं नाही, तरीही असा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. काही महिन्यांपूर्वीच महापालिकेनं 217 संस्थांना दिलेले भूखंड परत मागितले होते. त्यापैकी 120 संस्थांनी भूखंड परत केले होते. त्यापैकीच हे 27 भूखंड पुन्हा त्याच खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2016 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close