S M L

पानसरे हत्येप्रकरणी एसआयटी घेणार विरेंद्र तावडेला ताब्यात ?

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2016 09:03 AM IST

virendra_tawade16 जून : डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विरेंद्र तावडेची सीबीआय कोठडी आज संपत असल्याने त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास करण्सासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूरच्या विशेष तपास पथकाकडून त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

दाभोलकर हत्येप्रमाणेच तावडेचा पानसरे हत्येशी काही संबंध आहे का ते तपासण्यासाठी त्याचा ताबा मिळावा असा अर्ज या पथकाने कोल्हापूर सत्र न्यायालयात केला होता. हा अर्ज मंजूर झाल्यामुळेच एसआयटीचं तपास पथक पुण्याला जाऊन तावडेला ताब्यात घेणार आहे. वीरेंद्र तावडे हा आठ वर्ष कोल्हापुरात वास्तव्यास होता असं सीबीआय तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे त्याचा पानसरेंच्या हत्येशीही संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जातीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2016 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close