S M L

घामाघुम मुंबईकरांना मान्सून उशिरानेच भेटीला

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2016 09:38 AM IST

घामाघुम मुंबईकरांना मान्सून उशिरानेच भेटीला

स्वाती लोखंडे, ढोके, मुंबई - 16 जून : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना तुरळक सरीने भिजवलं...पण गारेगार असा दिलासा अजूनही मिळालेला नाही. मुंबईत 10 जून ही पावसाच्या आगमनाची तारीख असली तरी अजूनही मान्सूनचं आगमन झालेलं नाहीये. आणि आता तर मान्सूनचं आगमन हे 20 जूनच्या जवळपास होणार आहे.

मुंबईतला पाउस असाच मुंबईकरांना वाट पाहायला लावतो..यावर्षीच पाहा ना जूनचा तिसरा आठवडा संपत आलाय तरी पावसाचा थांगपत्ता नाही. सध्या मान्सून अरबी समुद्रावर नाही तर थेट बंगालच्या उपसागरावर आहे. त्यामुळे मुंबईत मान्सूनचं आगमन व्हायला अजून बराच कालावधी लागणार आहे. तर सुमद्राकडून जमिनीकडे वारे वाहू लागले आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की मान्सून येणार हे नक्की असतं. पण 7 जुनला केरळात पाऊस झाला आणि त्यानतंर लवकरच मुंबईत पाऊस पडेल असं वाटत असतानाच हवामान बदलल्याने मान्सून लांबलाय.

मुंबईत मान्सूनचं आतापर्यंत असं झालं आगमन

2011--5 जून

2012-- 17जून

2013-- 8जून

2014-- 15जून

2015--12 जून

2016-- अजूनही प्रतिक्षा

तज्ञांच्या मते मान्सूनच्या आगमनाची तारीख आणि त्याचं मुबलक पाऊस पडणे याचा काही संबंध नसतो. मुंबईत पाऊस पडायचा असेल तर ठराविक हवामनाची स्थिती गरजेची आहे.

खरंतर मुंबईकरांना पिण्याच पाणी मुबलक हवं असेल किंवा अन्नधान्य योग्य पिकायचं असेल तर तो मुंबईत नाही बरसला तरी फरक पडणार नाही.. पण हिवाळा अस्तित्वातच नसलेल्या या शहरात घामेजलेल्या अंगाने, दमछाक करीत प्रवास करणार्‍या प्रत्येकाच्या अंगावर तो बरसु लागला तर तो अमृतासारखा वाटतो म्हणून मुंबईकरांना मान्सूनची प्रतिक्षा चातकासारखी असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2016 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close