S M L

पोलिसांना 'तर्राट' करून कैद्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2016 03:36 PM IST

पोलिसांना 'तर्राट' करून कैद्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

कोल्हापूर - 16 जून : कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात कैदी आणि पोलिसांनी मिळून रुग्णालयाच्या कैदी वार्ड मध्येच दारूपार्टी केल्याचं उघडकीस आलंय. नुसती दारूपार्टी नाहीच तर पोलिसांना दारू पाजून खूनातल्या कैद्यांना पळवण्याचा प्रयत्न होता अशी माहितीही समोर आलीये.

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांवर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयात हा कैदी वार्ड असून या वार्डच्या टेरेसवर ही पार्टी सुरू होती. कैदी वॉर्डला चक्क बारचं स्वरूप आलं. विशेष म्हणजे पोलिसांना दारू पाजवून पुण्यातील मारने गँगचा आरोपी सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

मात्र, पोलिसांनी छापा टाकून हा सगळा कट उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. कैदी सोमप्रशांत मधूकर पाटीलसह त्याचे साथीदार अभिजित शरद चव्हाण, दिग्विजय शिवाजीराव पोवार, संजय दिनेशराव कदम आणि जगदीश प्रभाकर बाबर यांना अटक केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2016 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close