S M L

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेऊन विद्यार्थीनीची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2016 02:22 PM IST

 मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेऊन विद्यार्थीनीची आत्महत्या

औरंगाबाद – 17 जून : मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीने शिवाजी नगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. प्रतीक्षा वाघ असं या तरुणीचं नाव आहे. मैत्रिणीने पाठवलेल्या एसएमएसमुळे हा प्रकार उघड झाला.abad_girl

औरंगाबादची रहिवासी असलेल्या प्रतीक्षा वाघने 12 वीचं शिक्षण घेतल्यानंतर बीडमधल्या अंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात

प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. अंबेजोगाई येथील वस्तीगृहातील ती राहत होती. वस्तीगृहात मुली तीला त्रास देत असल्यानं तिनं आत्महत्या केल्याचा तिच्या वडिलांनी आरोप केलाय. प्रतीक्षावर तीच्या मैत्रिणींनी नोट्स चोरल्याचा आरोप केल्यानं ती गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली होती .ज्या मैत्रिणीनं तीच्यावर आरोप केला तीला प्रतिक्षानं आत्महत्या करण्याआधी एसएमएस करून मी तुझ्यामुळं जीवन संपवत असल्याचं सांगितलं होतं. एकंदरीत या प्रकऱणात पोलीस रॅगिंगचा प्रकार होता का याचा तपास करीत आहेत.

प्रतीक्षाचा शेवटचा मेसेज

तुझ्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागतंय. माझ्या शेवटाला तूच जबाबदार आहेस, हे मी कुणालाही सांगणार नाही. तुझ्या आनंदासाठी मी जीव देत आहे, आणि जोपर्यंत तू हा मेसेज वाचशील तोपर्यंत कदाचित मी गेली असेन. आपलं काय भांडण झालं हे कुणालाही कळलं नाही तर बरं होईल. मी तर चालली आहे पण तू माझ्या आईला आधार दे. तुझं नाव मी कुणालाही कळू देणार नाही मी …

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2016 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close