S M L

माजी पोलीस आधिकार्‍याने दिलं होतं दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना ट्रेनिंग?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 17, 2016 10:54 PM IST

माजी पोलीस आधिकार्‍याने दिलं होतं दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना ट्रेनिंग?

narendra dabholkar2133421

मुंबई- 17 जून : अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात पुण्यातील माजी पोलीस अधिकारी सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडेला या पोलीस अधिकर्‍यानेच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचं तसंच त्यांना आठवडाभर ट्रेनिंग दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याच्याविरुद्ध चौकशीचा फास आवळल्यानंतर या प्रकरणी नवीन माहिती तपास पथकाच्या हाती येत आहे. त्यानुसार, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी तीन महिने तावडे याला एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवून डॉ. दाभोलकर यांच्यावर लक्ष्य केंद्रीत करायला सांगितलं होतं.

त्याआधी 2009 मध्ये दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. पण गोव्यातील बॉम्बस्फोट प्रकरणामुळे हा हत्येचा कट चार वर्षे लांबला. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना पुणे पोलीस दलातील संबंधित अधिकार्‍यानेच शस्त्र पुरवल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर तत्कालीन पोलीस अधिकारी त्यांना जवळपास एक आठवडाभर ट्रेनिंग देत होता, अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे.

सीबीआयकडून संबंधित अधिकारी आणि तावडे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डस तपासले जात आहेत. तसेच सीबीआय त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. डॉ.वीरेंद्र तावडे अजूनही सीबीआयला सहकार्य करत नसल्याने काल कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली असून, सीबीआय तावडेची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफ टेस्ट घेण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच पुढील तपासात आणखी खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2016 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close