S M L

एकनाथ खडसेंवरील सर्व आरोप हे तथ्यहीन - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Jun 18, 2016 04:07 PM IST

fadnavis

18 जून : एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नसून, ते लवकरच सर्व आरोपांतून मुक्त होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

येत्या वर्षभरात मुंबई पुण्यासह पाच महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात सुरू आहे. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे पाठ फिरविणार्‍या एकनाथ खडसेंनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित आहेत. तसंच केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पियूष गोयल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील मंत्री आणि नेते उपस्थित आहेत. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी खडसेंची पाठराखण केली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारचं काम प्रामाणिकपणे सुरु आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरील सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. जनतेला कन्व्हिन्स करु शकत नाहीत, म्हणून कन्फ्युज करण्याचा विरोधकांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडून, काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात रस्त्यावर उतरून, गावोगावचे भ्रष्टाचार बाहेर काढा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.

तसंच, मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खडसेंवरील आरोपांत कोणतेही तथ्य नाही. लाचखोरी प्रकरणातील गजानन पाटीलशी खडसेंचा संबंध नाही हे एसीबीने सांगूनही त्यांच्यावर आरोप झाले. दाऊदचे फोन आल्याचा विषय झाल्यावर एटीएसकडे चौकशी दिली आणि त्यांनी निर्वाळा दिला की असा कुठला फोनच आला नाही. तर एमआयडीसी संदर्भात नाथाभाऊंनी राजीनामा दिला. चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी बोलणार नाही. या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ बाहेर येणार याची खात्री आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे नाथाभाऊंनी स्वत: राजीनामा देऊन, चौकशीची मागणी केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारचे भूखंड परत करावे, मग त्यांनी आमच्यावर आरोप करावे. हे लोक आम्हाला शिष्टाचार शिकवू शकत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने आरोप करते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचार करु, त्या दिवशी पद सोडून घरी जाऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, 5 वर्षांनी आम्हाला निवडून दिल्याचा जनतेला अभिमान वाटेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2016 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close