S M L

मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन, 48 तासांत चांगल्या पावसाचा अंदाज

Samruddha Bhambure | Updated On: Jun 20, 2016 07:45 PM IST

मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन, 48 तासांत चांगल्या पावसाचा अंदाज

मुंबई - 20  जून :  गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाची आतुरतेनं वाट पाहणार्‍या मुंबईकरांसाठी खूषखबर आहे. मोसमी पाऊस (मान्सून) अखेर आज मुंबईत दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्यानं मान्सूनच्या आगमनावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. तर पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने मुंबईसह डहाणू, मालेगाव आणि मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंतचा भाग व्यापला आहे. याबरोबरच मराठवाडा आणि विदर्भाचा पूर्ण भागही कवेत घेतला आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात सकाळपासून संततधार सुरू आहे.

मुंबईत काल दुपारनंतर रिमझिम सुरू झाली होती. मात्र, जोर कमी असल्यामुळं उकाडा कायम होता. आज सकाळपासून मात्र पावसानं चांगलंच बस्तान बसवलं असून हवेत बराच गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळं घामाच्या धारांनी त्रस्त झालेले मुंबईकर सुखावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2016 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close