S M L

सुलतानच्या शुटिंगनंतर मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं -सलमान खान

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2016 03:07 PM IST

salman_khan_sultan (6)21 जून : सुलतानच्या शुटिंगनंतर मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं, असं संतापजनक वक्तव्य अभिनेता सलमान खान याने केलंय. त्याच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

स्पॉट बॉय या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सलमानने अतिशय असंवेदनशील विधान केलंय.सुलतानच्या शुटिंगदरम्यान मी जेव्हा आखाड्याबाहेर यायचो, तेव्हा माझे पाय खूप दुखायचे, मला नीट चालता यायचं नाही. मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं, असं सलमान बरळला. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठतेय. ट्विटरवरही त्याच्यावर टीका होतेय. एकानं तर म्हटलंय की सलमान उद्धट किंवा असंवेदनशील नाहीय, तो मानसिकरित्या आजारी आहे त्यामुळे त्याच्यावर टीकाही करू नये असा संताप व्यक्त केलाय. तसंच

राष्ट्रीय महिला आयोगानेही सलमानच्या विधानाची दखल घेतलीये. आम्ही याची दखल घेऊ. यावर स्पष्टीकरण द्या, अशा आशयाचं पत्रंही आम्ही लिहीणार आहोत. हे अतिशय दुदैर्वी विधान आहे. तो एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्यानं संवेदनशील असावं अशी माझी अपेक्षा होती.

अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी दिलीये.

सलमान नक्की काय म्हणाला ?

"शुटिंगचे ते 6 तास खूप कठीण असायचे. एका 120 किलोच्या पहिलवानाला मला 10 वेळा उचलावं लागायचं. कारण एकच शॉट 10 वेगळ्या अँगलनं शूट होतो. तो पहिलवान मला अनेक वेळा खाली फेकायचा. मी जेव्हा आखाड्याबाहेर पडायचो, मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं. सरळ चालताही यायचं नाही. मी थोडं खायचो आणि पुन्हा शुटिंगसाठी जायचो. "

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2016 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close