S M L

अखेर मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या मुंबईतील 972 घरांची जाहिरात प्रसिद्ध

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2016 01:47 PM IST

mahada32322 जून : मे महिन्यात रखडलेली म्हाडाच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडला आहे. म्हाडाने मुंबईतील 972 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली असून 23 जून ते 23 जुलै दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. या घरांची सोडत 10 ऑगस्टला निघणार आहे.

मुंबईमध्ये म्हाडाने 972 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध केलीये. विशेष म्हणजे या जाहिरातीत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आजी माजी आमदारांना आरक्षण देण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. चांदिवलीला अत्यल्प उत्पन्न गटात आरक्षण कोटा आहे, तर सिद्धार्थनगर गोरेगाव इथल्या चार ठिकाणी अल्प-उत्पन्न गटात आरक्षण कोटा आहे.

या घरांसाठी 23 जून ते 23 जुलै या कालावधीत अर्ज मिळणार आहेत. तर ऑनलाईन अर्ज 24 जूनपासून 25 जुलैला दुपारी 12 वाजेपर्यंत भरता येणार आहेत. 24 जून ते 27 जुलै या दरम्यान बँकांमध्ये डीडी भरता येणार आहेत.

मालवणी मालाड, दहिसर या भागामध्ये ही अत्यल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न गटासाठी ही घरं उपलब्ध आहेत. सर्वात स्वस्त घर अत्यल्प उत्पन्न गट मालवणी मालाडमध्ये 8 लाख 17 हजारमध्ये उपलब्ध आहे. तर सर्वात महाग घर उच्च उत्पन्न गट शैलेंद्र नगर दहिसरमध्ये 83 लाख 86 हजार इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2016 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close