S M L

दाभोलकर हत्येप्रकरणी कोर्टाने सीबीआयला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2016 07:24 PM IST

23 जून : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी कोर्टाने सीबीआय आणि सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील साक्षिदारांची नाव फुटली आणि तो साक्षीदार मीडियांना मुलाखतीही देतो. हे चित्रपट किंवा स्क्रिप्ट लिहिताना होऊ शकतं, चौकशीत नाही. सगळीच माहिती आता बाहेर आलीये. त्यामुळे आम्हाला सांगण्यासारखं काहीच उरलं नाही. अशा शब्दात हायकोर्टाने सीबीआय आणि सरकारला फटकारून काढलं. तसंच सीबीआयचे अधिकारी माहिती फोडतात आणि पाठ थोपटून घेतात अशा शब्दात कोर्टाने सीबीआयचेही कान उपटले. असंच होत राहिलं तर चौकशीवर लक्ष ठेवणार नाही असा इशाराही कोर्टाने दिला.

M_Id_404282_mumbai_high_courtडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी सुनावणी 6 आठवड्यासाठी पुढे ढकलीय. आजच्या सुनावणीदरम्यान डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर न्यायालयानं आज तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनावणीच्या वेळी सीबीआयनं तपासाच्या प्रगतीचा अहवाल कोर्टाला सादर केला त्यावर न्यायालयानं राज्य सरकार आणि सीबीआयला फटकरलं. सगळीच माहिती आता बाहेर आलीये. त्यामुळे आम्हाला सांगण्यासारखं काहीच उरलं नाही. अधिकारी माध्यमांना माहिती देतात त्यामुळे तपासावर परिणाम होतो. ही अशीच स्थिती राहिली तर आम्ही तपासावर लक्ष्य ठेवणार नाही असंही कोर्टाने सुनावलं. तर वारंवार माध्यमांकडे जावून माहिती देवू नका असे खडे बोलही त्यांनी दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांना सुनावले. तसंच सरकारी वकिलांनी मीडियाशी बोलू नये असं कोर्टाने बजावलंय.

कोर्टाने फटकारलं ?

- सीबीआयचे अधिकारी माहिती फोडतात आणि पाठ थोपटून घेतात

- साक्षिदाराचं नावं लिक होते आणि तो माध्यमांना मुलाखती देतो

- हे चित्रपट किंवा स्क्रिप्ट लिहिताना होऊ शकत चौकशीत नाही

- माहिती बाहेर येत असल्यानं फरार आरोपींना सर्वच कळेल

- सीबीआय चौकशी करत असल्यानं पोलीस काहीच करत नाहीत

- त्यामुळेच पानसरे कुटुंबियांनीही सीबीआय चौकशीची मागणी केलीय.

- सीबीआय आणि पोलिसांनी थोडी परिपक्वता दाखवावी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2016 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close