S M L

दुष्काळग्रस्त लातूर चिंब भिजला, लातूरकर सुखावला

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2016 03:12 PM IST

दुष्काळग्रस्त लातूर चिंब भिजला, लातूरकर सुखावला

23 जून : दुष्काळामुळे वाळवंटाप्रमाणे अवस्था झालेला लातूर...पाण्यासाठी वणवण भटकणारे लातूरकर...एवढ्यावर न थांबता लातूर सारख्या शहराची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची धडपड..अशा या लातूरला आता पावसाने चिंब भिजवलंय..नुसतं भिजवलं नाहीतर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. नद्या,ओढे, नाले पावसाने तुडुंब भरलीये.

मान्सूनचं आगमन झाल्यावर दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणाचं चित्रं पार पालटून गेलंय. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी गाव परिसरात दमदार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका जास्त होता की, या भागात अतिवृष्टीचं चित्रं निर्माणं झालं होतं.

पहिल्याचं पावसात गावातील नाले, ओढे दुथडी भरुन वाहताहेत. गावातल्या रस्त्यावरही पाणी साचलंय. या भागातील तेरणा नदीसुद्धा भरभरुन वाहत आहे. तर तावरजा नदीपात्रातही या मोसमात पहिल्यादांच पाणी आलंय. काही महिन्यांपूर्वीच पाण्याच्या एका एका थेंबासाठी लातूरकरांना वणवण भटकावं लागत होतं. सगळीकडे रखरखाट झाला होता. वरून आग ओकणारा सूर्य आणि खाली भेगा पडलेली तहानलेली जमीन असं हे चित्र होतं. आता मात्र पावसानं जादू झाल्यासारखं हे चित्र बदललं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2016 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close