S M L

नाशिकमध्ये आणखी एक 'केबीसी' घोटाळा, आतापर्यंत 14 लाखांची फसवणूक

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2016 08:27 PM IST

नाशिकमध्ये आणखी एक 'केबीसी' घोटाळा, आतापर्यंत 14 लाखांची फसवणूक

नाशिक- 23 जून : केबीसीच्या घोटाळ्यानंतर नाशिकमधे आणखी एक आर्थिक घोटाळा समोर आला आहे. गुंतवलेल्या पैशाच्या मोबदल्यात महिन्याला 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक झाल्याच समोर आलं आहे. या बाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'दाम तिप्पट'च्या जाहिरातीना भुलून कशी फसवणूक होते याचं पुन्हा एक प्रकरण नाशिकमध्ये समोर आलंय. कष्टाने एक एक पैई जमा करून लोकांनी लाखो रुपये 'फ्युचर इंडिया कॅपिटल'या कंपनीत गुंतवले. सुरवातीला दोन महिने पैसे मिळाले नंतर अनेक महिने पैसे मिळत नसल्यानं गुंतवणूकदारांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आतापर्यंत 14 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र हा आकडा करोडो रुपयांमध्ये असल्याचं कळतंय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार शिरीष खरात याला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2016 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close