S M L

शिर्डीत चेंबरमध्ये गुदमरुन 4 शेतकर्‍यांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2016 05:13 PM IST

शिर्डीत चेंबरमध्ये गुदमरुन 4 शेतकर्‍यांचा मृत्यू

24 जून : शिर्डीतील नगरपंचायतच्या ड्रेनेज लाईनमध्ये चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. शेतीसाठी पाणी उपसा सुरू होतं. चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्याच्या प्रयत्नात चार शेतकर्‍यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिर्डीतील नगरपालिकेच्या ड्रेनेजलाईन मधून पाणी घेऊन शेतीसाठी वापरणार्‍या चार शेतकर्‍यांना आज आपला जीव गमवावा लागला. ड्रेनेजलाईनमध्ये लावलेल्या मोटरच्या चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी एक शेतकरी आत उतरला तो लवकर बाहेर आला नाही म्हणून दुसरा शेतकरी आत उतरला तोही बाहेर येत नाही म्हणून तिसरा आणि चौथा शेतकरी चेंबरमध्ये उतरला.

मात्र चेंबरमधील विषारी वायूने गुदमरून चार जणांना आपला जिव गमवावा लागण्याची दुदैर्वी घटना घडलीय. सखाराम शिंदे वय 45 , नवनाथ शेळके 54, बंडू मिंधर 38 आणि आनंद मोरे 35 या चार शेतकर्‍यांचा मृत्यू झालाय तर एकजण अत्यवस्थ आहे. त्याला शिर्डीच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मृत्युमुळे शिर्डीत हळहळ व्यक्त होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2016 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close