S M L

भिवंडीजवळ कालवार गावात गुंडाराज, गाड्यांची जाळपोळ सुरूच

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2016 05:21 PM IST

भिवंडीजवळ कालवार गावात गुंडाराज, गाड्यांची जाळपोळ सुरूच

भिवंडी - 24 जून : नाशिक , पुणे नंतर आता भिवंडी तालुक्यातील कालवार गावामध्ये दहशत माजवण्याठी बाईक आणि कार जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गावकरी चांगलेच वैतागलेले आहेत. मात्र भिवंडी तालुका पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे भयभीत झालेल्या गावकर्‍यांना विशेष ग्रामसभा घ्यावी लागली.

भिवंडी तालुक्यात कालवार या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गाड्या जाळण्याचे प्रकार सुरू आाहेत. एकाच वेळेस पाच गाड्या जाळण्यात येत आहेत. गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 50 ते 60 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. या दहशतीमुळे पाच ते सहा कुटुंबियांना स्थलांतर करावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाड्या जळीतकांड प्रकरणी ठाणे पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री यांना भेटून लेखी तक्रार देऊन सुद्धा अद्याप कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2016 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close